इंग्लंड व इटलीच्या चाहत्यांमध्ये तुंबळ हाणामारी
Updated On:

लंडन – फुटबॉलचा खेळ जितका उत्कंठेने पाहिला जातो तितक्याच हिरिरीने चाहतेही त्यात दंग झालेले असतात. आपला संघ जिंकला तर त्यांच्या आनंदाला पारावार राहत नाही मात्र, संघ पराभूत झाला तर दंगलीही घडतात.
असेच चित्र युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीनंतर लंडनच्या रस्त्यांवर दिसले. पराभूत झाल्यानंतर आपल्याच संघाच्या सुमार खेळावर संतापलेल्या इंग्लंड संघाच्या समर्थकांनी चक्क इटलीच्या समर्थकांवर भर रस्त्यातच हाणामारी केली.
आता ब्रीटन सरकारने काही लोकांची धरपकड केली असून अनेकांवर गुन्हेही दाखल केले आहेत. या सामन्यात इटलीने मिळवलेला विजय इंग्लंडच्या चाहत्यांना पचला नाही. वेम्बले स्टेडियमच्या बाहेर इंग्लंड आणि इटलीच्या चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.





