Smriti Mandhana -Palash Muchhal Wedding | भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाहसोहळा पार पडण्याआधी विघ्न निर्माण झाले. विवाह समारंभाआधी स्मृतीचे वडिल श्रीनिवास मानधना यांना रविवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला. या घटनेनंतर सांगलीत पार पडणारा स्मृती मानधना-पलाशचा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघल्यानंतर आता तिच्या होणाऱ्या नवऱ्याचीही (पलाश मुच्छल) प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे.पलाश मुछलची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पलाश मुछल याला व्हायरल इन्फेक्शन आणि पित्त वाढल्याने डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला घरी सोडले.Smriti Mandhana -Palash Muchhal Wedding | परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन एकमताने निर्णय स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना उपचारासाठी सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. त्यामुळे स्मृती मानधनाचा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. पलाश मुच्छल आणि मानधना कुटुंबीयांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन एकमताने हा निर्णय घेतला. गेल्या ३ दिवसांपासून या लग्न सोहळ्याची तयारी सुरू होती. वेगवेगळे इव्हेंट्स या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने पार पडत होते. आज सायंकाळी मुख्य लग्न सोहळा पार पडणार होता. मात्र त्याआधीच स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि आता पलाशची तब्येत बिघडली आहे. Smriti Mandhana -Palash Muchhal Wedding | हेही वाचा: पुण्यात बिबट्याची दहशत! लोहगाव विमानतळ आणि औंधमध्ये बिबट्या दिसला; वनविभागाचा हाय अलर्ट