Ram Mandir : प्राण प्रतिष्ठापणेनंतर राम लल्लाला दाखवणार 151 बनारसी पानांचा नैवेद्य; शास्त्रोक्त महत्व जाणून घ्या….

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. रामललाच्या अभिषेकाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. मुख्य अभिषेक सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे, परंतु 15 जानेवारीपासूनच पूजा आणि विधी यासारखे कार्यक्रम सुरु होतील.
22 जानेवारी रोजी दुपारी प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे. प्राणप्रतिष्ठा दरम्यान, राम मंदिराच्या गर्भगृहात केवळ पाच लोक उपस्थित राहणार आहेत, ज्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख यजमान असतील.
तसेच, RSS प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचा समावेश असेल.
22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात राम लल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल.
प्राणप्रतिष्ठा अनेक मोठ्या विधींनी केली जाईल. त्यानंतर प्रभू रामाला 56 प्रकारचे नैवेद्य दाखवल्या जाणार आहे. यापैकी एक म्हणजे मसाला बनारसी पान. फक्त एक पान नाही तर 151 पानांचा नैवेद्य यावेळी प्रभू श्रीरामाला दाखवला जाणार आहे. यामागील धार्मिक महत्त्व देखील आपण जाणून घेणार आहोत…
हिंदू धर्मात पुजेसाठी अनेक साहित्य वापरले जातात. विड्याच्या पानांशिवाय कोणताही धार्मिक विधी पूर्ण होत नाही असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानवांनी पूजेमध्ये विड्याच्या पानांचा वापर केला आणि म्हणूनच प्रत्येक विशेष पूजेमध्ये विड्याची पाने आणि सुपारीचा वापर केला जातो.
माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यासह अनेक देवता विड्याच्या पानात वास करतात असे मानले जाते. त्यामुळे राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी विड्याची पानंही अर्पण करण्यात येणार आहे. रामललाच्या अभिषेक प्रसंगी, बनारसमधून 151 विशेष विड्याच्या पानांचा नैवेद्य दाखवला जाणार आहे.
151 पानांव्यतिरिक्त 1000 पानांची ऑर्डर देण्यात आली आहे जी भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटली जाईल. प्रसादासाठी हे पान बनारसच्या रिंकू चौरसिया बनवणार आहेत. असे म्हटले जाते की त्यांच्या दोन पिढ्या बऱ्याच काळापासून श्रीरामांना विड्याची पानं पाठवत होत्या.





