नागा चैतन्यनंतर आता भावानेही उरकला साखरपुडा; शेअर केले खास फोटो

Zainab Ravdjee | दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वी नागा चैतन्यने शोभिता धुलीपालाशी साखरपुडा केला होता. यानंतर आता नागार्जुनचा धाकटा मुलगा अखिल अक्किनेनीचाही साखरपुडा झाला आहे. नागार्जुनने दुसऱ्या नवीन सूनेचे म्हणजेच जैनब रावदजीचे कुटुंबात स्वागत केले. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
View this post on Instagram
अखिल आणि झैनब काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता दोघांनीही साखरपुडा करून त्यांच्या नात्याला अधिकृतपणे पुष्टी दिली आहे. त्यांचे लग्न पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे. अखिल अक्किनेनीची जैनब रावदजीसोबत एंगेजमेंट झाल्याची बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
झैनब रावदजी कोण आहे?
अखिल अक्किनेनीची होणारी बायको झैनब रावदजी ही मुंबईतील एक आर्टिस्ट आहे. तसेच ती एक लाईफस्टाईल ब्लॉगर असून ती स्किनकेअरवर ब्लॉग्ज तयार करत असते. हैदराबादची रहिवासी असलेली झैनब ही मुस्लिम कुटुंबातील आहे. ती उद्योगपती झुल्फी रावदजी यांची मुलगी आणि ZR रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष झैन रावदजी यांची बहीण आहे. तर अखिलचा 1995 मध्ये वडील नागार्जुन यांच्या ‘सिसिंदरी’ चित्रपटात तो बालकलाकार म्हणून झळकला होता.
तर दुसरीकडे, अक्किनेनी कुटुंब शोभिता धुलिपालासोबत नागा चैतन्यच्या लग्नाची तयारीही करत आहे. हे दोघेही येत्या ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.





