मालिकेत पुनरागमनानंतर मृणाल दुसानिसचे नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण

Mrunal Dusanis | अभिनेत्री मृणाल दुसानिसने लग्नानंतर काही वर्ष अमेरिकेत वास्तव्य केल्यानंतर आता पुन्हा भारतात परतली आहे. मृणालने मनोरंजन क्षेत्रातून ब्रेक घेतला होता आता तिने पुन्हा कमबॅक केले आहे. काही दिवसांपूर्वी मृणालच्या नवीन मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. यानंतर आता मृणालने आणखी एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
मृणाल आणि तिचा नवरा नीरज मोरे यांनी ठाण्यात नवीन रेस्टॉरंट सुरु केले आहे. यावेळी ज्ञानदा रामतीर्थकर, राजश्री निकम, वंदना गुप्ते या अभिनेत्रींनी रेस्टॉरंटच्या उद्धाटनाला हजेरी लावली होती. मृणाल दुसानिसने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात एका ठिकाणी इंटेरियर डिझाइनचं काम सुरु असल्याचे पाहायला मिळाले. Mrunal Dusanis |
यावरून मृणाल नवीन व्यवसाय सुरु करणार असल्याने अनेकांनी म्हटले होते. परंतु याबाबत तिने अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यानंतर आता तिने रेस्टॉरंटच्या उद्धाटनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मृणालच्या या नवीन रेस्टॉरंटचं नाव ‘बेली लाफ्स’ असं आहे.
दरम्यान, मृणालचे स्टार प्रवाहवरील नव्या मालिकेचे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ असं नाव आहे. या मालिकेत मृणालसोबत अभिनेता विजय आंदळकर, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे हे कलाकार आहेत. Mrunal Dusanis |
हेही वाचा:
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; आता मतदानाच्या दिवसाची प्रतीक्षा, छुप्या प्रचारावर राहणार नजर





