कृष्ण, द्रौपदीनंतर आता रामही भाजपमध्ये दाखल
Updated On:

नवी दिल्ली – छोट्या पडद्यावर प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेले व लोकप्रीय झालेले कलाकार अरूण गोविल यांनीही आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. त्यांनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पक्षात प्रवेश केला.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना त्यांचा हा प्रवेश महत्वाचा मानला जातो आहे.
पक्षप्रवेशानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जय श्रीराम अशी घोषणा देण्यात चुकीचे काही नसल्याची टीप्पणी गोविल यांनी केली आहे. छोट्या पडद्यावरच्याच महाभारत या मालिकेत भगवान श्रीकृष्णांची भूमिका साकारणारे नीतीश भारद्वाज व याच मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारणाऱ्या रूपा गांगुली या दोघांनी खूप पूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, अरूण गोविल निवडणूक लढवणार नसून केवळ पक्षाचा प्रचार करणार असल्याचे सांगितले गेले आहे.





