घटस्फोटानंतर कोंकणा सेन ७ वर्षाने लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट?

Konkana Sen Sharma | अभिनेत्री कोंकणा सेन घटस्फोटानंतर वयाच्या ४५ वर्षीय एकटी आयुष्य जगत आहे. अलीकडेच कोंकणा सेन ३८ वर्षीय अमोल पराशरच्या ‘ग्राम चिकित्सालय’ या वेब सीरिजच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये दिसली. यावेळी दोघांनी एकत्र प्रवेश केला आणि हसत हसत फोटोसाठी पोजही दिले. यानंतर आता दोघांच्याही डेटींगच्या चर्चा रंगल्या आहेत.
एक्सेल एंटरटेनमेंटच्या कार्यालयात झालेल्या या स्क्रीनिंगचा उद्देश ‘ग्राम चिकित्सालय’मधील अमोल पाराशरच्या कामाचं प्रदर्शन करणं हा होता, पण सगळं लक्ष अमोल आणि कोंकणा सेन शर्माच्या प्रवेशाने आणि फोटोसाठी दिलेल्या पोजने वेधून घेतलं. कोंकणा एका स्लीक ग्रे पँटसूटमध्ये अत्यंत स्टायलिश दिसत होती.
View this post on Instagram
दुसरीकडे, अमोल पाराशर निळ्या स्ट्रिपच्या सूटमध्ये आकर्षक दिसत होता. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं की, कोंकणा जेव्हा अमोलसोबत पोज द्यायला लागते, तेव्हा ती आधीपेक्षा जास्त आनंदी दिसते. यामुळे असं वाटतं की दोघे अधिकृतपणे आपलं नातं जाहीर करत आहेत. मात्र अमोल पराशर आणि कोंकणा सेन यांनी त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांवर उघडपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. Konkana Sen Sharma |
दरम्यान, कोंकणा सेन शर्माने रणवीर शौरीशी लग्न केलं होतं पण १० वर्षांच्या संसारानंतर ते विभक्त झाले. या जोडप्याला एक मुलगा आहे. यानंतर आता कोंकणा ७ वर्षाने लहान असलेल्या अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. Konkana Sen Sharma |
हेही वाचा:
नाशिकमध्ये भाजप आमदाराच्या विराट सभेत झळकले लॉरेन्स बिश्नोईचे फोटो


