कोंकणासोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर अमोलने स्पष्टच सांगितले…

Amol Prashar | अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अमोल पराशर यांच्या मागील काही दिवसांपासून डेटींगच्या चर्चा सुरू आहेत. यावर दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता वयाने ७ वर्षांनी मोठ्या असलेल्या कोंकणाला डेट करण्याच्या चर्चांवर अमोलने मौन सोडलं आहे.
एका मुलाखतीत अमोलने कोंकणा सेनसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर सांगितले की, “सुरुवातीला मी प्रत्येक न्यूजवर प्रतिक्रिया द्यायचो. पण, आता मी याकडे फार लक्ष देत नाही. जर तसं काही असेल आणि मला शेअर करावंसं वाटलं तर मी स्वत: ते सोशल मीडियावर शेअर करेल. तुमच्या आयुष्यात अनेक लोक येतात. कोणाच्या तुम्ही जास्त जवळ असता तर कोणाच्या नाही. प्रत्येक रिलेशनला नाव देणं गरजेचं नाही.” Amol Prashar |
पुढे तो म्हणाला, “सरदार उधम सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी विक्की कौशल आणि कतरिना कैफ एकमेकांना डेट करत होते. लोक मला विक्कीच्या रिलेशनशिपबाबत विचारात असे. त्यामुळे मी विक्कीला म्हणायचो की तू स्वीकार कर. तेव्हा विक्की मला म्हणाला होता की योग्य वेळ आल्यावरच मी करेन.”
तर लग्नाबाबतही अमोलने सांगितले की, “लग्न झालं तर मी ते देखील सोशल मीडियावर पोस्ट करेन, कारण हेच सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. पण सध्या माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही.” दरम्यान, अलीकडेच अमोल पराशरच्या ‘ग्राम चिकित्सालय’ या वेब सीरिजच्या स्क्रिनिंगला कोंकणा सेनने हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या डेटींगच्या चर्चांना उधाण आले होते. Amol Prashar |
दरम्यान, कोंकणाने २०१०मध्ये रणवीर शौरीसोबत लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काही वर्षांतच ते वेगळे राहू लागले आणि २०२० मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना १४ वर्षांचा मुलगा आहे. Amol Prashar |
हेही वाचा:
Pune News : ..…अन् हिऱ्याची अंगठी सापडली, ग्रामस्थांकडून कामगारांचे कौतुक





