घटस्फोटानंतर धनुषच्या मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रंगल्या डेटिंगच्या चर्चा

Dhanush and Mrunal Thakur | दाक्षिणात्य अभिनेता धनुष त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. घटस्फोटानंतर आता धनुष मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. ती अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर…. दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यावरून ही चर्चा रंगली आहे.
मृणालने आयोजित केलेल्या बर्थडे पार्टीत धनुष सहभागी झाला होता. तर सन ऑफ सरदार २ सिनेमाच्या प्रमिअरचा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये धनुष मृणालचा हात धरून बोलताना दिसत आहे. यावेळी धनुष ब्लॅक जॅकेटमध्ये दिसला, तर मृणाल फ्लॉवर प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसली. Dhanush and Mrunal Thakur |
View this post on Instagram
‘सन ऑफ सरदार २’मध्ये मृणालने मुख्य भूमिका साकारली आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या या चर्चांवर मृणाल आणि धनुष दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
धनुषचे पहिले लग्न सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत झालं होतं. लग्नाच्या १८ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर आता धनुषचे नाव मृणालसोबत जोडले जात आहे. Dhanush and Mrunal Thakur |
Dhanush and Mrunal Thakur are dating? pic.twitter.com/ItWYJdsm8a
— Aryan (@Pokeamole_) August 3, 2025
दरम्यान, मृणाल मूळची महाराष्ट्रातील असून तिचा जन्म धुळ्यातील मराठी कुटुंबात झाला. तिनं तिच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून सुरु केली. त्यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. अलीकडेच ती ‘सन ऑफ सरदार २’मध्ये अजय देवगणसोबत मुख्यभूमिकेत झळकली. Dhanush and Mrunal Thakur |
हेही वाचा :





