Allu Arjun | दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांच्या ‘स्पिरिट’ सिनेमातून अभिनेत्री दीपिका पादुकोण बाहेर पडली. त्या पाठोपाठ आता संदीप रेड्डी यांनी अल्लू अर्जुनचाही पत्ता कट केल्याचं बोललं जात आहे. अल्लू अर्जुनच्या जागी दक्षिणेचा हा सुपरस्टार त्याची जागा घेऊ शकतो. सध्या या सिनेमाचं शूटिंगही थांबवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी अल्लू अर्जूनने संदीप रेड्डी यांच्यासोबत एक सिनेमा साइन केला होता. त्यातून आता अभिनेत्याचा पत्ता कट केला आहे. अल्लू अर्जुनच्या जागी ज्युनियर एनटीआरला चित्रपटात घेतले जाऊ शकते. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, दीपिकाने दररोज 8 तासांचे शूटिंग, जास्त फी आणि नफ्यात वाटा मागितला होता. मात्र, दिग्दर्शकाला तिच्या या अटी मान्य नव्हत्या. दीपिका नुकतीच आई झाली आहे आणि आता तिला तिचे काम आणि वैयक्तिक आयुष्य यात संतुलन राखायचे आहे. त्यामुळे तिने 8 तासांचे शूटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. Allu Arjun | दरम्यान, संदीप रेड्डींच्या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला असला तरी अल्लू अर्जुन आणि दीपिका पादुकोण नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. साऊथ दिग्दर्शक अॅटली कुमारच्या सिनेमात त्यांची वर्णी लागली आहे. AA22xA6 या सिनेमात दीपिका आणि अल्लू अर्जुन दिसणार आहेत. यामध्ये अल्लू अर्जुनचा डबल रोल असेल. २०२६ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. Allu Arjun | हेही वाचा : माजी विद्यार्थ्यांनी ४० वर्षांनी पुन्हा भरवली शाळा; १९८६च्या आठवणींना दिला हृदयस्पर्शी उजाळा!