चीननंतर आता जर्मनीने दिला ट्रम्पला झटका ; H-1B व्हिसासाठी भारतीयांना दिला पर्याय

Dr Philipp Ackermann on visa। अमेरिकेने H-1B व्हिसाच्या शुल्कात लक्षणीय वाढ केल्यामुळे भारतीय आयटी कंपन्या आणि व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या अडचणी वाढल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय भारतासाठी एक मोठी समस्या असल्याचे मानले जात आहे. त्यानंतर अमेरिकेच्या H-1B व्हिसाला पर्याय म्हणून चीनने त्यांचा k व्हिसा लॉन्च केला. त्यानंतर आता जर्मनीने देखील भारतीयांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे.
भारतातील जर्मन राजदूत डॉ. फिलिप अकरमन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला, “ज्यामध्ये त्यांनी भारतीयांना विशेष म्हटले. तसेच जर्मनीतील भारतीय कामगारांबद्दल बोलण्याचा हा एक उत्तम क्षण आहे. जर्मनीमध्ये भारतीय सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये आहेत.”असे त्यांनी यावेळी नमूद केले.
“भारतीय जर्मन लोकांपेक्षा जास्त कमावतात” Dr Philipp Ackermann on visa।
त्यांनी पुढे सांगितले की,”सरासरी, भारतीय जर्मनीमध्ये जर्मन लोकांपेक्षा जास्त कमावतात आणि ही खूप चांगली बातमी आहे, कारण जास्त पगाराचा अर्थ असा आहे की भारतीय जर्मनीमध्ये जास्त मेहनत करतात. ते इतरांपेक्षा जर्मन समाजात जास्त योगदान देतात.”असे त्यांनी यावेळी म्हणत एक चांगला संकेत दिला.
Here is my call to all highly skilled Indians.
Germany stands out with its stable migration policies, and with great job opportunities for Indians in IT, management, science and tech.
Find your way to Germany to boost your career: https://t.co/u5CmmrHtoF pic.twitter.com/HYiwX2iwME
— Dr Philipp Ackermann (@AmbAckermann) September 23, 2025
ते म्हणाले की,”आम्ही कठोर परिश्रमावर विश्वास ठेवतो, म्हणून आम्ही सर्वोत्तम लोकांना सर्वोत्तम नोकऱ्या देतो. आमचे स्थलांतर धोरण जर्मन कारसारखे आहे – विश्वासार्ह, आधुनिक आणि समाधानकारक. आमचे धोरण अतिशय स्पष्ट आणि अचूक आहे, ज्यामध्ये कोणतेही विचित्रता नाही. अमेरिकेचा उल्लेख न करता ,”आम्ही एका रात्रीत नियम बदलत नाही.”त्यांनी दोनलंड ट्रम्प यांच्यावर टीका केली.
जर्मनीमध्ये नोकरी कशी शोधावी Dr Philipp Ackermann on visa।
ते म्हणाले, “मी सर्व उच्च कुशल भारतीयांना जर्मनीमध्ये येण्याचे आवाहन करतो.” ते पुढे म्हणाले, “स्थिर स्थलांतर धोरणे आणि आयटी, व्यवस्थापन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीयांसाठी उत्कृष्ट नोकरीच्या संधींमुळे जर्मनीला एक वेगळे स्थान आहे.” असे त्यांनी सांगितले . तसे जर्मनीमध्ये करिअर एक्सप्लोर करण्यासाठी, तुम्ही या वेबसाइटला भेट देऊ शकता: http://linktr.ee/germanyinindia





