छगन भुजबळांनंतर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई करोना पॉझिटिव्ह
Updated On:

सातारा – राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई करोनाबाधित आढळले असून सध्या ते गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. विधिमंडळ अधिवेशनानंतर शंभूराज देसाई यांनी करोना चाचणी केली होती. ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
सध्या देसाई गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. त्यांची प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन- चार दिवसांमध्ये प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित करोना चाचणी करून घ्यावी. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री देसाई यांनी केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या भुजबळ निवास्थानी विश्रांती घेत आहेत.





