अखेर बच्चू कडूंची खदखद बाहेर; म्हणाले,”मला भाजपमध्ये खूप त्रास, मित्रांसाठी फिल्डिंगचे धंदे त्यांनी बंद करावे”

Bacchu Kadu : राज्यात आजपर्यंतचे सर्वात मोठे बंद शिवसेनेत झाले आणि सत्तेत असणारे महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेतून बाहेर पडलेला शिंदे गटाने भाजपसोबत(BJP) हात मिळवणी करून सत्ता स्थापन केली. दरम्यान, शिंदे गटाला शिवसेनेचा मित्रपक्ष असणारा प्रहार जनशक्ती हा पक्ष देखील येऊन मिळाला. मात्र काही काळापासून प्रहार आणि भाजपमध्ये खटके उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी ‘भाजपाकडून (BJP) मला त्रास होतोय, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात आता एकच खळबळ उडाली आहे.
प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अकोला येथे प्रसारमाध्यमांशी सवांद साधताना आपली नाराजी बोलून दाखवली. यावेळी त्यांनी, “मला भाजपाचा(BJP) खूप त्रास आहे. आम्हाला काँग्रेसचा आणि इतर पक्षांचा जितका त्रास होत नाही तितका त्रास भाजपाचा(BJP) आहे. माझ्या मतदारसंघात भाजपाचा(BJP)सगळ्यात जास्त त्रास होतोय. परंतु, आम्ही त्यांना जुमानत नाही. दोन खासदार, तीन आमदार आणि अजून ताकद लावा. परंतु, माझं म्हणणं आहे की मैत्री करताना, मित्रत्व निभावताना सगळ्याच अनुषंगाने निभावलं पाहिजे,” असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी, “मैत्री न निभावता फक्त कामापुरतं वापरायचं आणि नंतर दुर्लक्ष करायचं. हे चुकीचं आहे आणि भाजपाकडून असं होऊ नये. भाजपावाल्यांनी(BJP) वरून खालपर्यंत व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे. परंतु, मला वाटतं त्यांनी केवळ सत्तेपुरता विचार न करता, सत्तेपलिकडे काही गोष्टी असतात, त्या स्वीकारल्या पाहिजेत. तसेच आपल्याबरोबर असलेल्या लोकांसाठीच फिल्डिंग लावायची हे उद्योग बंद केले पाहिजेत” असा खोचक सल्ला देखील त्यांनी (Bacchu Kadu) दिला आहे.
बच्चू कडू (Bacchu Kadu) हे अमरावतीतल्या अचलपूरचे आमदार आहेत. तसेच अमरावतीतल्या मेळघाट विधानसभेतही बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पार्टिचा आमदार आहे. आगामी काळात बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा पक्ष अमरावतीतून लोकसभा लढेल असं वक्तव्य बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. तेव्हापासून भाजपा (BJP)आणि प्रहार जनशक्ती पार्टीमध्ये संघर्ष सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे.





