‘आरपार’नंतर ललित प्रभाकर नव्या चित्रपटात; ‘ओल्या सांजवेळी 2.0’ गाणं रिलीज

Lalit Prabhakar | अभिनेता ललित प्रभाकरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आरपार‘ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात तो अभिनेत्री ऋता दुर्गुळेसोबत मुख्यभूमिकेत दिसत आहे. या चित्रपटानंतर आता ललितची आणखी एका चित्रपटात वर्णी लागली आहे. ‘आरपार’च्या यशानंतर ललित प्रभाकर एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘प्रेमाची गोष्ट’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील ‘ओल्या साजं वेळी’ हे गाणं अत्यंत लोकप्रिय झाले. या गाण्यातील प्रेमाची एक वेगळी जादू आजही कायम आहे. आता लवकरच ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटाचा सीक्वल ‘प्रेमाची गोष्ट 2’ येणार आहे. या गाण्यात ललित प्रभाकर आणि ऋचा वैद्य यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ललित एक नव्या लव्ह स्टोरीमध्ये पाहायला मिळणार आहे. Lalit Prabhakar |
View this post on Instagram
‘प्रेमाची गोष्ट 2’या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले आहे. निर्माते संजय छाब्रिया तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत प्रेक्षकांसाठी गाजलेल्या प्रेमकथा घेऊन येणारे सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता आणखी एक प्रेमकथा घेऊन येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात भाऊ कदम, स्वप्नील जोशी, ललित प्रभाकर, ऋचा वैद्य व रिधिमा पंडित हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. येत्या २२ ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. Lalit Prabhakar |
हेही वाचा:
navratri fasting: नवरात्र उपवासात काय खावे आणि काय टाळावे? जाणून घ्या रक्तातील साखरेशी असलेला संबंध





