Ibrahim Zadran : अफगाणिस्तानच्या इब्राहिम झाद्रानने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत रंगली आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो असा असणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या इब्राहिम झाद्रानने इतिहास रचला आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 177 धावांची खेळी केली आहे. त्याच्या या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने इंग्लंडसमोर विजयासाठी 50 षटकात 326 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
इब्राहिम झाद्रानने ‘हा’ विक्रम केला
इब्राहिम झाद्रानने 106 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्यानंतर आक्रमक खेळी करत 146 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने 177 धावा केल्या. कर्णधार शाहिदीसोबत चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या खेळीमुळे इब्राहिम झाद्रान सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने इंग्लंडच्या बेन डकेटचा विक्रम मोडला आहे. बेन डकेटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 165 धावांची खेळी केली होती.
पहिला अफगाणी फलंदाज
झाद्रानने वनडे क्रिकेटमध्ये 150 पेक्षा जास्त धावा करण्याची दुसरी संधी आहे. यापूर्वी झाद्रानने श्रीलंकेविरुद्ध 2022 मध्ये 162 धावा केल्या होत्या. इतकंच काय तर चॅम्पियन्स ट्रॉफी शतक ठोकणारा पहिला अफगाणी फलंदाज ठरला आहे. झाद्रानने 2019 मध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. त्याच्या नावावर वनडेत सहा शतके आणि 7 अर्धशतके आहेत.





