Afghan Fan Delhi : भारत-अफगाणिस्तान सामन्यानंतर एका अफगाण चाहत्याने जिंकली सर्वांची मनं; नेमकं काय केलं? पाहा VIDEO
Afghan Fan Delhi : अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतासोबत मालिका खेळण्यासाठी दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडून स्टेडियम भाड्याने घेतले होते, परंतु मैत्रीपूर्ण संबंधांमुळे अफगाण क्रिकेट बोर्डाकडून भाडे घेण्यात आलेले नाही.

IND vs AFG T20I Series Afghan Fan Cleans Arun Jaitley Stadium BCCI Generous Support : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील नुकत्याच संपलेल्या टी-२० मालिकेत अनेक रंजक गोष्टी पाहायला मिळाल्या. भारतातच मालिका होत असूनही भारतीय संघ पाहुणा आणि दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम अफगाणिस्तानचे ‘होम ग्राउंड’ कसे, याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. ही मालिका अधिकृतपणे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (ACB) यजमानपदाखाली खेळवली गेली होती. भारताने तिसऱ्या सामन्यात १२७ धावांनी दणदणीत विजय मिळवून ३-० असा व्हाईटवॉश दिला; मात्र सामन्यानंतर एका अफगाण चाहत्याने दिल्लीचे स्टेडियम स्वतः स्वच्छ केल्याचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सामन्यानंतर कचरा उचलणारा अफगाणी फॅन; भारतीय प्रेक्षकांचे जिंकले मन!
सामना संपल्यानंतर सर्व प्रेक्षक निघून गेले असता, एका अफगाण चाहत्याने स्टेडियममधील स्टँड्समध्ये पडलेला कचरा स्वतः वेचून परिसर स्वच्छ केला. काही काळापूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांसोबत वाद घालणारे अफगाण प्रेक्षक भारतात मात्र अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेमळ वागताना दिसले. भारत आणि बीसीसीआयने दाखवलेल्या आदरातिथ्यामुळे अफगाणी नागरिकांमध्ये भारताबद्दल असलेले नितांत आदर आणि कृतज्ञतेचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
BCCI चा मोठा दिलदारपणा; दिल्ली स्टेडियमचे भाडे माफ, उत्पन्नही ACB ला!
THIS IS WHY WE LOVE AFGHANISTAN 🇮🇳❤️🇦🇫
After the final T20I, an Afghanistan fan was seen picking up garbage left behind by fans in the stands. 🥺
No cameras. No attention. Just a beautiful gesture of respect and responsibility. 🫡
ABSOLUTELY WHOLESOME. ❤️ pic.twitter.com/F8AWJdwpGO
— Mukku (@Cric_Mukku) September 17, 2026
मालिकेचे यजमानपद अफगाणिस्तानकडे असल्याने संपूर्ण खर्च आणि व्यवस्था एसीबीची होती. मात्र, मैत्रीच्या नात्याने बीसीसीआयने दिल्लीच्या स्टेडियमचे कोणतेही भाडे आकारले नाही, तर दिल्ली क्रिकेट असोसिएशनने अनेक सुविधा मोफत पुरवल्या. या मालिकेतून मिळणारा सर्व महसूल थेट अफगाणिस्तान बोर्डाला मिळणार असल्याने संकटात सापडलेल्या अफगाण क्रिकेटला यातून मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
अफगाणिस्तान क्रिकेटच्या उभारणीत भारताचा मोठा वाटा –
गेल्या १५ वर्षांत राजकीय अस्थिरतेमुळे इतर देशांनी अफगाणिस्तानचा दौरा करणे टाळले. अशा कठीण काळात बीसीसीआयने अफगाणिस्तानला भारतात होम ग्राउंड्स उपलब्ध करून दिले, सरावाच्या सुविधा दिल्या आणि त्यांच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये व्यासपीठ मिळवून दिले. याच भक्कम पाठिंब्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेट आज जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने उभे असून, त्याचे प्रतिबिंब मैदानावर आणि मैदानाबाहेर दोन्हीकडे पाहायला मिळत आहे.





