AFG vs NZ : अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटी रद्द झाल्याने 91 वर्षे जुना विक्रम निघाला मोडित,जाणून घ्या इतिहास…

Afghanistan vs New Zealand Test : अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामना रद्द झाल्याने 91 वर्षे जुना विक्रम मोडीत निघाला. 21 व्या शतकातील ही पहिलीच कसोटी होती जी एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द झाली. याआधी केवळ 20 व्या शतकात अशाप्रकारे कसोटी सामना रद्द करण्यात आला होता. ही कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील आठवी कसोटी होती, जी एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द झाली होती. याआधी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटची कसोटी 1998 मध्ये रद्द झाली होती. यानंतर पुढील रद्द झालेल्या कसोटीतही न्यूझीलंड संघाचा सहभाग होता.
ग्रेटर नोएडा येथील ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राउंडवर 09 ते 13 सप्टेंबर दरम्यान अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात एकमेव कसोटी खेळली जाणार होती, परंतु पावसाने खेळ अशा प्रकारे खराब केला की गोलंदाजी करणेही अशक्य झाले. या सामन्यात एक चेंडू टाकणे तर दूर राहिले पण टाॅसही होऊ शकला नाही.
91 वर्षे जुना विक्रम मोडित…
गेल्या 91 वर्षात आणि 730 कसोटी सामन्यांमध्ये, अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटी हा पहिला सामना होता जो आशिया खंडात पावसामुळे रद्द झाला आहे.
The one-off Test against Afghanistan has officially been called off early on day five following further rain in Noida.
The Test squad will relocate to Sri Lanka tomorrow ahead of the two-Test WTC series in Galle starting Weds, Sept 18 – Live in NZ on @skysportnz #AFGvNZ #SLvNZ pic.twitter.com/IyfPdvlwMN
— BLACKCAPS (@BLACKCAPS) September 13, 2024
कसोटी इतिहासात आतापर्यंत फक्त 8 कसोटीच झाल्या आहेत रद्द (एकही चेंडू न टाकता)
1. कसोटी क्रमांक 34 : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (25-08-1890) ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर.
2. कसोटी क्रमांक 264 : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (08-07-1938) ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर.
3. कसोटी क्रमांक 675 : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (31-12-1970) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड.
4. कसोटी क्रमांक 1113 : न्यूझीलंड विरूध्द पाकिस्तान (03-02-1989) कॅरिसब्रुक, ड्युनेडिन.
5. कसोटी क्रमांक 1140 : इंग्लंड विरूध्द वेस्टइंडिज (10-03-1990) बोर्डा, जॉर्जटाउन, गयाना.
6.कसोटी क्रमांक 1434 : पाकिस्तान विरूध्द झिम्बाब्वे (17-12-1998) इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद.
7.कसोटी क्रमांक 1435 : भारत विरुद्ध न्यूझीलंड (18-12-1998) कॅरिसब्रुक, ड्युनेडिन.
8.कसोटी क्रमांक 2549 : अफगाणिस्तान विरूध्द न्यूझीलंड (13-9-2024) न्यूझीलंड ग्रेटर नोएडा
दोन्ही संघाचे पुढील वेळापत्रक…
कसोटी सामना रद्द झाल्यानंतर, आता अफगाणिस्तान संघ यूएईमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे, तर न्यूझीलंड संघ 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिका 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. याशिवाय न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 18 ते 30 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.




