Manoj Jarange : ‘आडवं बोलत नाही, सरकारला पट्ट्यावर घेत नाही आणि…’; जरांगेंचा मोठा इशारा, उपोषणाला सुरुवात
Manoj Jarange : . त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते देखील उपोषणाला बसले आहेत. उपोषण सुरू होण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी मोठा इशारा सरकारला दिला आहे. आडवं बोलत नाही, सरकारला पट्ट्यावर घेत नाही आणि पुन्हा आंदोलन थांबणार नाही.

Manoj Jarange : ३० मे पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला होता. त्यानुसार आजपासून अंतरवाली सराटी येथील एका ठिकाणी त्यांच्या उपोषणाला सुरूवात झाली आहे. हे आंदोलन कठोर असणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले होते.
त्यानुसार भर उन्हामध्ये पायात चप्पल नाही, अन्न आणि पाणी न घेता मनोज जरांगे बाजवर रणरणत्या उन्हात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते देखील उपोषणाला बसले आहेत. उपोषण सुरू होण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी मोठा इशारा सरकारला दिला आहे. आडवं बोलत नाही, सरकारला पट्ट्यावर घेत नाही आणि पुन्हा आंदोलन थांबणार नाही. (Manoj Jarange)
काल मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्ठमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत केलेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आजपासून अंतरवालीत आमरण उपोषण सुरु केलं आहे. सरकार येत राहिल, जात राहिल…मी उपोषणावर ठाम आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच ड्राफ्टपेक्षा 58 लाख नोंदी धारकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, हा आदेश काढला पाहिजे, असं मनोज जरांगेंनी सांगितले.
हेही वाचा : BJP Govt : मुख्यमंत्र्यांची दिल्लीत भेट, मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत! ‘या’ मंत्र्यांना मिळणार नारळ?
गॅझेटरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडीटी द्या नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारला अधिकार आहे, ते कलम कमी करू शकतात, बलिदान देणाऱ्या कुटुंबाचा निधी आणि नोकरीचा विषय आहे. मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याचा एक विषय आहे, असेही ते म्हणाले. (Manoj Jarange)
मनोज जरांगे यांच्या मागण्या कोणत्या? (Manoj Jarange)
१ मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या.
२ सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा. 1994 च्या धर्तीवरच GR काढा.
३ महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या.
४आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा.
५ सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा.
६ महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे.
७ कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॉलिडिटी द्या.
८ मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा.
९ स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा.
१० शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा.
हेही वाचा : Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचा स्मार्ट गुंतवणुकीचा निर्णय; घरभाड्यातून महिन्याला मिळणार १६ लाख रुपये





