Satara: : कला व वाणिज्य महाविद्यालयात मोडी लिपी अभ्यासक्रमास प्रवेश सुरू
Satara कला व वाणिज्य महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे दुर्मिळ मोडी लिपीचे संवर्धन होण्यासाठी मोडी लिपी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.

Satara: येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठातर्फे दि.15 ऑक्टोंबर पासून मोडी लिपी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्ग सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व इतिहास अभ्यासकांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सावंत यांनी केले आहे.
कला व वाणिज्य महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे दुर्मिळ मोडी लिपीचे संवर्धन होण्यासाठी मोडी लिपी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. मध्ययुगीन महाराष्ट्राची राजलिपी असलेली मोडी लिपी गेल्या अनेक वर्षात अस्तंगत झाली आहे. या लिपीतच महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास दडला असून आज मोडी लिपीचे वाचक नसल्याने या इतिहासावर प्रकाश टाकणारे अभ्यासक कमी आहेत. त्यामुळेच या लिपीचे संवर्धन होण्यासाठी कला व वाणिज्य महाविद्यालयात हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
अभ्यासक्रमास प्रवेश संख्या मर्यादीत आहे. प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षण वर्गात विद्यार्थ्यांना मोडी लिपी लेखन, वाचन यासह शिवकालीन व पेशवेकालीन अस्सल दुर्मिळ कागदपत्रांची माहिती मोडी अभ्यासक देणार आहेत. प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांनी प्रा. गौतम काटकर (मोबा. 9881550706), इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. बी. सातपुते (मोबा. 9881033098) व महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सावंत यांनी केले आहे.





