Satara News : उंब्रजच्या निसर्गोपचारतज्ञ नीलम देशमुख यांचा निसर्गोपचार गौरव सन्मान पुरस्काराने गौरव
उंब्रज (ता. कराड) येथील निसर्गोपचार तज्ज्ञ नीलम सुनील देशमुख यांना निसर्गोपचार गौरव सन्मान पुरस्काराने (Satara News) गौरविण्यात आले.

Satara News : उंब्रज (ता. कराड) येथील निसर्गोपचार तज्ज्ञ नीलम सुनील देशमुख यांना निसर्गोपचार गौरव सन्मान पुरस्काराने (Satara News) गौरविण्यात आले. बुलढाणा येथील भातृमंडळ हॉलमध्ये आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, एजीएमए व योगा निसर्गोपचार चिकित्सक असोसिएशनमार्फत निलम देशमुख यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बुलढाणा मतदारसंघातील आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्षा पूजा गायकवाड, डॉ. सचिन सुपे, डॉ. त्रिदीप गुहा, डॉ. प्रशांत कपाले, एमजीएम विद्यापीठाचे योगा विभाग प्रमुख गंगाप्रसाद खरात यांच्या हस्ते पुरस्काराचे (Satara News) वितरण झाले.
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, दिशा चव्हाण, विजय नवल-पाटील, विनोद ढोबळे, रावसाहेब घोडेगाव, रामेश्वर शिंदे, श्रीकांत अंजुटगी, भानुदास परबत, अशोक देवकर, संजय गवारे, स्मिता खारकर, राहुल देशमुख, आशिष सूर्यवंशी यांच्यासह आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. या सन्मान सोहळ्यासाठी राज्यभरातील निसर्गोपचारतज्ञ (Satara News) मोठ्या संख्येने उपस्थित होते.






