पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागातील पदवी, पदव्युत्तरची प्रवेशप्रक्रिया पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. प्रवेशप्रक्रियेच्या नवा तारखा लवकरच प्रसिद्ध केले जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
विद्यापीठ आवारातील पदवी, पदव्युत्तर आणि इंटिग्रेडेट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार प्रवेश परीक्षाही घेण्यात आली. त्यानंतर संबंधित विभागाकडून मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली. त्यानुसार विद्यार्थ्यांना दि. 20 ऑगस्टपासून प्रत्यक्ष प्रवेशाचा अर्ज, कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने अपलोड करावयाची होती. मात्र विद्यापीठाने शुक्रवारी काही कारणास्तव ही प्रक्रिया पुढे ढकलली आहे.
काही विभागाने मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली. त्यानंतर प्रवेशाचा अर्ज, कागदपत्रे स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड केल्यानंतर त्याची पडताळणी होणार आहे. त्यानंतर प्रवेश निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होणार होती. त्यापूर्वीच पुन्हा एकदा ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.