पुणे | एक हजार ९२८ विद्यार्थ्यांचे प्रवेश जाहीर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}– पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रांतर्गत इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची तिसरी विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. प्रथम पसंती क्रमानुसार १ हजार ९२८ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे.
या फेरीसाठी एकूण प्रवेश क्षमता ३९ हजार ६४७ असून, अंतिम यादीत ३ हजार ८५५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २ हजार ९५३ विद्यार्थ्यांना पसंतीनुसार प्रवेश दिले असून, कला २५८, वाणिज्य ११७५, विज्ञान शाखेत १४३९, व्यावसायिक शिक्षणासाठी ८१ प्रवेश जाहीर झाले आहेत. विद्यार्थ्यांनी लॉगीनमध्ये प्रोसिड फॉर ऍडमिशनवर क्लिक करून २३ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करावा.
या फेरीनंतरही प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नंतर वेळापत्रक घोषित केले जाईल. अद्याप ९०२ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत.
विद्यार्थ्यांनी रिक्त जागा, महाविद्यालयाचे कट ऑफ बघून पसंतीक्रम नोंदवावेत, असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक संचालक डॉ. ज्योती परिहार यांनी सांगितले आहे.
नामांकित महाविद्यालयांचे कट ऑफ
डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज – कला (२४४), विज्ञान (३९२), मॉडर्न कॉलेज – कला (३१६), वाणिज्य (३८८), विज्ञान (३७५), आबासाहेब गरवारे कॉलेज – कला (३०४), विज्ञान (४२८), बीएमसीसी कॉलेज – वाणिज्य (२२८), सिम्बायोसिस कॉलेज – कला (३२६), वाणिज्य (३२०).





