Badlapur School: आदित्य ठाकरेंचे थेट राष्ट्रपतींना साकडे; बलात्काऱ्याला दहशतवाद्यासारखीच वागणूक द्या…

Badlapur School Girl Rape Case | Aditya Thackeray – बदलापूर प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेतेआदित्य ठाकरे यांनी घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे सांगत तसेच या घटनेचा निषेध नोंदवत शक्ती कायद्यासंदर्भात निर्णय घेण्याची राष्ट्रपतींकडे मागणी केली आहे. तशी पोस्टच त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. दररोज आम्ही महिलांसाठी स्वसंरक्षणाचे क्लासेस सुरू करण्याचा विचार करतो. यापूर्वी देखील आम्ही असे केले होते.
मात्र आतला आवाज मला विचारतो, का? असे क्लास सुरू करणे काळाची गरज असल्याने आम्ही लवकरच हे क्लास सुरू करणार असलो तरी, दुर्दैवाने प्रश्न उरतोच की असं का? सुरक्षेची जबाबदारी ही महिलांवरच का असावी? समाज आणि कायदा महिलांच्या सुरक्षिततेची खात्री का देऊ शकत नाही.
Everyday that we think of starting off with “self defence classes” for women, like we did earlier, a deeper voice asks me why?
And even though we will start soon, since the times demand it unfortunately, the question still is why?
• Why should the responsibility of safety be…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 20, 2024
देशभरातून आपल्याला दररोज विनयभंग, बलात्काराच्या घटनांबद्दल ऐकायला मिळते. त्यामुळे आपला संताप होतो. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा, निष्पक्ष न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी हीच आमची अपेक्षा आहे. मानवतेविरुद्धचा गुन्हा म्हणता येईल असा बलात्कारासारखा अपराध सहन करता येणार नाही,असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.





