महिलांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दिवशी जमा होणार लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता

मुंबई : महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन महिलांच्या बँक खात्यात जमा झाले होते. यानंतर आता सप्टेंबर महिन्याचे पैसे बँकेत कधी जमा होणार हा प्रश्न महिलांना पडला होता. यानंतर आता आता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता कधी बँक खात्यात जमा होणार याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
काय म्हणाल्या अदिती तटकरे ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम रायगडमध्ये होत आहे. 29 सप्टेंबर रोजी तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होत आहे. त्याचदिवशी म्हणजे 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यात तिसरा हफ्ता जमा होणार आहे. सप्टेंबरपर्यंत आलेल अर्ज यांचे लाभ वितरित करण्यात येतील. या योजनेमुळं 2 कोटी महिलांना लाभ दिले जाणार आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत.
कधीपर्यंत करू शकता लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज?
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. महिलांचा अर्ज स्वीकार झाल्यानंतर तीन महिन्यांचे एकत्रित असे ४५०० खात्यात जमा होणार आहेत. ज्या महिलांनी अजूनही या योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.





