Mumbai Bus Accident : नोकरीच्या पहिल्याच दिवशी काळाचा घाला; कुर्ला बस अपघातात 19 वर्षीय आफरिन शाहचा मृत्यू
Updated On:

मुंबई – कुर्ला येथील झालेल्या या दुर्घटनेत आफरिन शाह हिचा सोमवारी नोकरीचा पहिला दिवस होता. कामावरून घरी परत येत असताना बेस्ट बसच्या धडकेत तिचा मृत्यू झाला. नोकरीच्या पहिल्याच दिवशी कामावरून परत येत असताना काळाने तिच्यावर घाला घातला, यामुळे तिच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
याच सोबत कनीज फातिमा यांचा कामवार जाताना मृत्यू झाला आहे. फातिमा या रुग्णालयात नाईट ड्यूटीसाठी निघाल्या असताना या बेस्ट बसच्या धडकेत त्यांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून, कनीज अंसारी (55), आफरिन शाह (19), अनस शेख (20), शिवसम कश्यप (18), विजय गायकवाड (70), फारुख चौधरी (54), कनीज फातिमा, असे मृत झालेल्यांची नावे आहेत.





