‘बिग बॉस 18’मध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्रीला कोरोनाची लागण; सर्वांना केले ‘हे’ आवाहन

Shilpa Shirodkar | अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस 18’मध्ये सहभागी झाली होती. बराच काळ रुपेरी पडद्यापासून दूर राहिल्यानंतर तिने अचानक रिअॅलिटी शोमध्ये एन्ट्री घेतल्याने ती चर्चेत आली होती. मात्र आता शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांना धक्का दिला आहे. शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावरुन स्वतः तिने यासंदर्भात माहिती दिली. तसेच, सर्वांना सुरक्षित राहण्याचं आणि मास्क घालण्याचं आवाहनही केलं.
शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण झाल्यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. शिल्पाने 19 मे रोजी इंस्टाग्रामवर कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. तिनं इन्स्टा पोस्टमध्ये लिहिले की, “नमस्कार मित्रांनो, मी कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले आहे. सुरक्षित रहा आणि मास्क घाला.”
या पोस्टनंतर तिचे सहकलाकार आणि चाहते लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना करत आहेत. सोनाक्षी सिन्हा, जुही बब्बर, नम्रता शिरोडकर यांनी पोस्टवर कमेंट करत तिला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
शिल्पा शिरोडकरने 1989 ते 2000 पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. 13 वर्षांनंतर, तिनं ‘एक मुठ्ठी आसमान’ द्वारे पुनरागमन केलं आणि त्यानंतर 2024 मध्ये सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉस 18 मध्ये दिसली. Shilpa Shirodkar |
कोव्हिडचे 8 रुग्ण मुंबईत आढळले
दरम्यान, मुंबईच्या केईएम रुग्णालयात काल दोन कोव्हिड सदृश्य असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अजून आठ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात या रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे. Shilpa Shirodkar |
हेही वाचा:





