Well Done Aai movie poster : अभिनेत्री विशाखा सुभेदार आईच्या भूमिकेत! चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज

Well Done Aai movie poster : ‘आई’ या दोन शब्दांचा अर्थ खूप मोठा आहे. निसर्गाने आईला पुननिर्मितीचे वरदान दिले आहे. याचे कारण देवानंतर पहिले स्थान आईला देण्यात आले आहे. आईची कहाणी सांगणारे अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. दरम्यान, आता आईवर आधारलेला एक मराठी विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नुकतेच या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ‘वेल डन आई’ असे या मराठी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटामधून काही काळापासून अलिप्त राहिलेली मराठी अभिनेत्री कम बॅक करणार आहे. चित्रपटात आईच्या भूमिकेत विशाखा सुभेदार ही अभिनेत्री दिसणार आहे.
विशाखाने छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळख मिळवलेली आहे. तिने मालिकांमधून छोटा पडदा गाजवला. तिने काही चित्रपटांतून व्यक्तीरेखा साकारलेल्या आहेत. मात्र, केवळ सहाय्यक कलाकर म्हणूनच तिच्या वाट्याला भूमिका आल्या आणि त्या तिने चांगल्या निभावल्या आहे. या चित्रपटातून प्रथमच विशाखा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
हा चित्रपट 14 नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजय निकम, आयुष पाटील, जयवंत वाडकर, सिमरन खेडेकर, बीना सिद्धार्थ, तन्वी धुरी, विपुल खंडाळे हे कलाकर सुद्धा दिसणार आहेत.
या चित्रपटात एका आईची गोष्ट दाखवण्यात आली आहे. त्यामुळे विशाखाला मुख्य भूमिकेत पाहणे हे तिच्या चाहत्यांसाठी एक गूड न्यूज असणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संदीप गचांडे आणि शंकर धुलगुडे यांनी केले आहेत. तर शंकर अर्चना बापू धुलगुडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

