Well Done Aai Movie Teaser : ‘आई’ या दोन शब्दांचा अर्थ खूप मोठा आहे. निसर्गाने आईला पुननिर्मितीचे वरदान दिले आहे. याचे कारण देवानंतर पहिले स्थान आईला देण्यात आले आहे. आईची कहाणी सांगणारे अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. दरम्यान, आता आईवर आधारलेला एक मराठी विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेल डन आई असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे पहिल्या पोस्टरनंतर आता नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामधून काही काळापासून अलिप्त राहिलेली मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार ही पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. विशाखाने छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळख मिळवलेली आहे. तिने मालिकांमधून छोटा पडदा गाजवला. याशिवाय अनेक मराठी चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या पात्रांमुळे प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळवली. मात्र, केवळ सहाय्यक कलाकर म्हणूनच तिच्या वाट्याला भूमिका आल्या आणि त्या तिने उत्तमप्रकारे निभावल्या. या चित्रपटातून अभिनेत्री विशाखा सुभेदार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये विशाखाने साकारलेल्या आईचं पात्र आणि तिच्या तीन मुलांची कथा असून ती खूप गोड अशा पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे टीझरमध्ये दिसत आहे. हा चित्रपट 14 नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार होता, मात्र आता चित्रपटाच्या रिलीजची नवी तारीख समोर आली असून १ अॅाक्टोबर या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजय निकम, आयुष पाटील, जयवंत वाडकर, सिमरन खेडेकर, बीना सिद्धार्थ, तन्वी धुरी, विपुल खंडाळे हे कलाकर सुद्धा दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संदीप गचांडे आणि शंकर धुलगुडे यांनी केले आहेत. तर शंकर अर्चना बापू धुलगुडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हेही वाचा : पंतप्रधानांच्या हस्ते ‘उत्तरप्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शना’चे उद्घाटन ; मुख्यमंत्री म्हणाले,”देशाची जीआय राजधानी”