अभिनेत्री सुष्मिता सेनला ह्रदयविकाराचा झटका

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला ह्रदयविकाराचा झटका आला असून त्यानंतर तिच्यावर अँजेओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती स्वतः सुष्मिताने पोस्ट करून दिली आहे. सुष्मिताला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तिच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करून स्टेंट टाकण्यात आल्याचेही तिने सांगितले आहे. आपल्या चांगल्या फिटनेससाठी प्रसिद्ध असणाऱ्या 47 सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.
सुष्मिताने तिचे वडील सुबीर सेन यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. सोबतच गेल्या काही दिवसांत नेमके काय घडले याबद्दल तिने लिहिले आहे. सुष्मिताने तिच्या कॅप्शनमध्ये म्हटले,”आपल्या हृदयाची काळजी घ्या. तुमच्या चांगल्या आणि वाईट काळात तुमचे हृदय तुमची साथ देणार आहे. मला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर अँजिओप्लास्टीही करण्यात आली. स्टेंट टाकण्यात आले आहे. आता माझे हृदय सुरक्षित आहे,’ असे तिने म्हटले आहे.





