अभिनेत्री रुचिरा जाधव झळकणार मोठ्या पडद्यावर; साकारणार मुख्य भूमिका

Ruchira Jadhav | झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत अभिनेत्री रुचिरा जाधव पाहायला मिळाली. या मालिकेनंतर तिने ‘बिग बॉस’ मराठीमध्ये सहभाग घेतला. यामुळे देखील ती चांगलीच चर्चेत आली होती. छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर रुचिरा चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एका मराठी सिनेमात रुचिरा जाधवची वर्णी लागली आहे. ‘बाबू’ असे या सिनेमाचे नाव आहे.
या सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या तिच्यासोबत अंकित मोहन देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर आणि सॉन्ग लाँच सोहळा पुण्यात दिमाखात पार पडला. तसेच चित्रपटातील टायटल सॉन्गही या दरम्यान लाँच करण्यात आले. मयूर शिंदे दिग्दर्शित ‘बाबू’ चित्रपट येत्या 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. Ruchira Jadhav |
View this post on Instagram
रुचिरा या सिनेमात सुप्रियाची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. तर रुचिरासह अभिनेता अंकित मोहन देखील यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा आगरी कोळी भाषेतील पहिला मराठी सिनेमा आहे. या सिनेमात नेहा महाजन, स्मिता तांबे, संजय खापरे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. रुचिरा ही सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. Ruchira Jadhav |
हेही वाचा:
महाराष्ट्रात होणार मोठा ‘खेळ …! उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये केलं ‘शिफ्ट’





