अभिनेत्री परिणीती चोप्राने दाखवली मुलाची पहिली झलक; फोटोला दिले खास कॅप्शन म्हणाली…

Parineeti Chopra : बॅालिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा विविध कारणामुळे नेहमी चर्चेत असायची. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. राघव चड्ढासोबत लग्नबंधनात अडकल्यानंतर परिणीती मोठ्या पडद्यावर झळकली नाही. तिला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. पण ती पुन्हा कधी कमबॅक करणार याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, परिणीतीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा आईबाबा झाले आहेत. दोघेही याचा आनंद घेत आहेत. १९ अॅाक्टोबरला परिणीतीने गोंडस बाळाला जन्म दिला. जन्मलेले बाळ मुलगा असून या बाळाची पहिली झलक परिणीतीने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. एका महिन्यानंतर परिणीतीने बाळाचा झलक दाखविली आहे. या फोटोला सुंदर कॅप्शन देत अभिनेत्रीने बाळाचे नावही जाहीर केले आहे.
View this post on Instagram
परिणीतीसोबतच राघव यांनी देखील त्यांच्या सोशल मीडियावरुन आपल्या चिमुकल्यासोबतचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंकडे पाहून परिपूर्ण कुटुंब असल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली आहे. “जलस्य रूपम्, प्रेमस्य स्वरूपम् तत्र एव नीर”, असे कॅप्शन दिले आहे. त्यांनी आपले मुलाचे नाव नीर ठेवले आहे. या नावाचा अर्थही परिणीतीने सांगितला आहे. “आमच्या हृदयाला जीवनाच्या या शाश्वत थेंबात शांतता मिळाली. आम्ही त्याचं नाव ठेवलं ‘नीर’ शुद्ध, दिव्य, आणि असीम”, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
२०२३ मध्ये परिणीती चोप्रा आणि राधव चड्ढा लग्नबंधनात अडकले. ऑगस्ट महिन्यात परिणीतीने गरोदर असल्याचे सांगितले होते. ऑक्टोबर महिन्यात तिने चिमुकल्याला जन्म दिला. चिमुकल्याच्या आगमनाने दोघेही भारावून गेले असून, या गोष्टीचा आनंद दोघेही घेत आहेत.
हेही वाचा : क्रिप्टो बाजारात हाहाकार ; गुंतवणूकदारांचे १.२ ट्रिलियन डॉलर्स पाण्यात, नेमकं कारण काय?





