अभिनेत्री मृणाल दुसानिस करणार मालिकाविश्वात कमबॅक? ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

Mrunal Dusanis| ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस. आपल्या सोज्वळ अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. मात्र लग्नानंतर तिने अमेरिकेत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वीच ती नवरा आणि मुलीसोबत पुन्हा भारतात परतली आहे.
त्यानंतर मृणाल पुन्हा एकदा कमबॅक करणार असल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी तिने दिलेल्या मुलाखतीत ती मालिकेत काम करायला उत्सुक असल्याचे तिने म्हंटले होते. त्यानंतर तिचा आता एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मराठी सिरियल्स ऑफिशिअल या इंस्टाग्राम पेजने मृणालचा एक सेल्फी शेअर केला आहे. ज्यात ती एक क्रू मेंबरबरोबर दिसत असून या फोटोला ‘अँड वी आर बॅक ऑन सेट’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. हा फोटो सेटवरचा असून यामध्ये तिने पारंपरिक ड्रेस घातल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मृणाल कमबॅक करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. परंतु याबाबत अद्याप कोणतीही अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही. Mrunal Dusanis|
View this post on Instagram
दरम्यान, कलर्स मराठीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेनंतर मृणालने चार वर्षांचा ब्रेक घेतला होता. या मालिकेत ती शशांक केतकरसोबत पाहायला मिळाली होती. मृणालने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’सह ‘अस्सं सासर सुरेख बाई’,’ तू तिथे मी’ या मालिकांमध्ये काम केले होते. याशिवाय ती ‘श्रीमंत दामोदर पंत’ या सिनेमातही झळकली होती. यानंतर आता मृणाल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? हे पहावे लागणार आहे.
Mrunal Dusanis|
हेही वाचा:
दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ‘ऑस्ट्रिया देश’ भारतासाठी किती महत्त्वाचा; जाणून घेऊया…





