अभिनेत्री मयुरी देशमुखची ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत एन्ट्री

Mayuri Deshmukh| अभिनेत्री मयुरी देशमुख ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरात पोहचली. या मालिकेत मयुरीने डॉ. मानसी ही भूमिका साकारली होती. तिच्या या मालिकेतील भूमिकेचे सर्वांकडून कौतुक करण्यात आले होते. यानंतर ती अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसली. आता पुन्हा एकदा मराठी मालिकाविश्वातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज होणार आहे. लवकरच मयूरी लोकप्रिय मालिकेत दिसणार आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. हे पात्र मयुरी देशमुख साकारताना दिसणार आहे. मयुरी ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत ती ‘सुखदा’ हे पात्र साकारणार आहे. आता तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का? हे पहावे लागणार आहे.
View this post on Instagram
मयुरीचा एक व्हिडिओ स्टार प्रवाहच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मयुरी मन धागा धागा जोडते नवा मालिकेत एन्ट्री घेत असल्याचं सांगत आहे. मयुरीला पुन्हा मराठी मालिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. सध्या तिच्या या भूमिकेसाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. Mayuri Deshmukh|
मयुरी देशमुखच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच तिचा ‘लग्न कल्लोळ’ सिनेमात प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेसह ‘इमली’ या हिंदी मालिकेत देखील काम केले आहे. यात तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती. Mayuri Deshmukh|
हेही वाचा:
ऋता दुर्गुळे झळकणार हिंदी वेबसीरिजमध्ये; ‘या’ अभिनेत्यासोबत झळकणार





