‘या’ मालिकेतून करणार अभिनेत्री मयुरी देशमुख पुनरागमन
Updated On:

मुंबई – मराठी अभिनेत्री ‘मयुरी देशमुख’ लवकरच हिंदीत पदार्पण करत आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या मालिकेत मयुरी झळकणार आहे. ‘खुलता कळी खुलेना’ या मराठी मालिकेतून मयुरी देशमुखने आपल्या चाहत्यांचे मनोरंजन केले होते.
पती आणि अभिनेता आशुतोष भाकरे याच्या आत्महत्येनंतर चार महिन्यांनी मयुरीने नवा प्रोजेक्ट हाती घेतल्याने तिचा चाहता वर्ग सुखावला आहे. दरम्यान, ‘इमली’ या मालिकेत मयुरी देशमुखसह मराठी अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री सुम्बुल तौकीर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
मयुरी या मालिकेत गश्मीरच्या मैत्रिणीची भूमिका साकारणार आहे. नुकतंच ‘इमली’चा ऑफिशल प्रोमो मयुरीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.





