अभिनेत्री महिमा चौधरीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं लग्न? ‘या’ अभिनेत्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल

Mahima Chaudhary look | अभिनेत्री महिमा चौधरीला ‘परदेस’ या चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र गेला काही काळ ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. यादरम्यान महिमाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात ती वधुच्या लुकमध्ये दिसत आहे. यावरून महिमाने वयाच्या 52 व्या वर्षी लग्नगाठ बांधल्याची चर्चा सुरू झाली आहे. यात तिच्यासोबत अभिनेता संजय मिश्रा दिसत आहे. ब्रायडल लूकमध्ये ती संजय मिश्रा यांच्यासोबत पोझ देताना दिसत आहे. या दोघांना अचानक अशा पद्धतीने लग्नसोहळ्याच्या पोशाखात पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी ‘महिमा चौधरीने इतक्या वयस्कर व्यक्तीशी लग्न का केलं’, ‘हा तिचा पती आहे का?’ असाही प्रश्न केला आहे. परंतु काही वेळानंतर महिमा चौधरीच्या या व्हिडीओमागचं सत्य समोर आलं. हा व्हिडीओ तिच्या लग्नाचा नाही तर तिच्या आगामी चित्रपटासाठीचा होता. संजय मिश्रासोबत ती ‘दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी’ या चित्रपटाचं प्रमोशन करत होती. यासाठी तिने नवरीचा लूक केला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी हा अनोखा फंडा वापरला होता. Mahima Chaudhary look |
View this post on Instagram
महिमा आणि संजय हे ‘दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. काही दिवसांपूर्वी महिमाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर केला होता. ‘वधू भेटली आहे, आता तयार व्हा, कारण वरात लवकरच निघणार आहे.. ‘ असं कॅप्शन देत हा पोस्टर शेअर करण्यात आला होता.
या चित्रपटात महिमा आणि संजय मिश्रा यांच्यासोबतच व्योम आणि पलक ललवानी यांच्याही भूमिका आहेत. त्यामुळे महिमा चौधरीने दुसरं लग्न केलेलं नाही, तर आगामी चित्रपटाचे त्यांनी अनोखे प्रमोशन केले आहे. Mahima Chaudhary look |
हेही वाचा :
“…तर आम्ही तालिबानचा नाश करू… ” ; शांतता चर्चा अयशस्वी झाल्यानंतर पाकचे संरक्षण मंत्री संतापले





