साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री वरलक्ष्मीचे झाले ‘लग्न’; रोमँटिक फोटो शेअर दिली,’माहिती’

Varalaxmi Sarathkumar । साऊथचा हिट चित्रपट ‘हनुमान’मध्ये दिसलेली अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमारचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री ब्रायडल गेटअप सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. व्हायरल होणाऱ्या या फोटोत अभिनेत्री पतीसोबत रोमँटिक आणि क्लोज पोज देताना दिसत आहे.
वरलक्ष्मीने स्वतः लग्नानंतरचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हे फोटो शेअर करण्यासोबतच साऊथ अभिनेत्रीने लिहिले की, ‘अखेर लग्न झाले. माझ्या राजकुमाराने मला विचारले की मी त्याच्याशी लग्न करेल का आणि मी हो म्हणत केले. कायम एकत्र राहू. प्रेम आणि आनंद कायम राहू दे. मी तुझ्यावर प्रेम करते निकोलाई.’
View this post on Instagram
चाहत्यांकडून या फोटोवर प्रेमाचा वर्षाव होत आहे. वरलक्ष्मीच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास, ती लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. मांग टिक्का, केसात गजरा, गळ्यात चोकर आणि फुलांच्या माळासह अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे. चाहते त्याचे सोशल मीडियावर खूप अभिनंदन करत आहेत.
वरलक्ष्मी आणि निकोलाई 14 वर्षांपासून एकत्र आहेत अभिनेत्रीने याच वर्षी 1 मार्च रोजी मुंबईतच एंगेजमेंट केली होती.वरलक्ष्मी ही प्रसिद्ध स्टार आर सरथकुमार यांची मुलगी आहे. अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये जवळपास 25 चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये दिसते तिने तमिळ चित्रपट पोदा पोडी (२०१२) मध्ये पदार्पण केले.
याशिवाय वरलक्ष्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती अखेरची प्रशांत वर्माच्या ‘हनुमान’ या चित्रपटात दिसली होती. यामध्ये ती तेजा सज्जाच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली होती. त्याचवेळी, आता त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये धनुषचा ‘रायन’ आहे.





