अभिनेत्री कृती सॅननची बहीण नूपुर अडकणार विवाहबंधनात; शेअर केले खास फोटो

Nupur Sanon | अभिनेत्री कृती सॅननची बहीण अभिनेत्री नुपूर सॅननने अखेर तिच्या नात्याची कबुली दिली आहे. नुपूरने प्रपोजलचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
नुपूरने बॉयफ्रेंड स्टेबिन बेन सोबत नात्यात अडकल्याचे जाहीर केले आहे. हा प्रपोजल एका सुंदर बोटीवर पार पडला. या खास क्षणासाठी नुपूरने सुंदर फुलांचा ड्रेस घातला होता. तर स्टेबिन निळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसला होता.
या खास क्षणाचे फोटो नुपूरने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. पहिल्या फोटोमध्ये, स्टेबिन बेन एका गुडघ्यावर नुपूरला प्रपोज करताना दिसत आहे, तर त्याच्या मागे ‘तु माझ्याशी लग्न कराशील का?’ असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, नुपूर तिची अंगठी दाखवत आहे.
तर आणखी एका फोटोमध्ये नुपूरने व्हिडिओ कॉलवर तिच्या पालकांना याबद्दल माहिती दिल्याचा फोटो शेअर केला आहे. नुपूरने व्हिडिओ कॉलमधील एक फोटो देखील शेअर केला. हे फोटो शेअर करताना नुपूरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मला हो म्हणण्याचा सर्वात सोपा मार्ग मिळाला.”
View this post on Instagram
;
याशिवाय नुपूर आणि स्टेबिन ११ जानेवारी रोजी उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याचे देखील वृत्त समोर आले आहे. हे लग्न एका खाजगी समारंभात होईल, त्यानंतर मुंबईत भव्य रिसेप्शन होणार असल्याचेही म्हंटले जात आहे.
नुपूर सॅनन शेवटची ‘टायगर नागेश्वर राव’ या तेलुगू चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. येत्या काळात ती ‘नूरानी चेहरा’ या चित्रपटात दिसणार आहे, जो तिचा पहिला हिंदी चित्रपट असेल. तर स्टेबिन संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नाव आहेत. संगीत क्षेत्रात तो २०१८ पासून सक्रिय असून त्याने अनेक बॉलीवूड चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.
हेही वाचा:
“दहशतवादी मसूद अजहरला भारतात आणा, ट्रम्प करू शकतात, तर…”; ओवैसींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन





