‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, व्यक्त केला आनंद

Akshaya Naik debut in Hindi Film | अभिनेत्री अक्षया नाईकला ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. यातील तिच्या अभिनयाचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले. आता अक्षयाला लॉटरी लागली आहे. तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. ‘ग्रेटर कलेश’मधून तिने हिंदीत डेब्यू केला आहे. तिचा पहिला हिंदी सिनेमा थेट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.
नुकतेच अक्षयाने तिच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगचे काही फोटो शेअर करत करत आनंद व्यक्त केला आहे. तिने इनस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “पहिलं हे नेहमीच खास असतं. पण जेव्हा ते नेटफ्लिक्ससोबत असतं तेव्हा आणखी खास असतं. काल संध्याकाळपासून माझ्या कानात फक्त एकच वाक्य गुंजत होतं ते म्हणजे, ‘जब तुम किसी चीज को पुरी शिद्दत से चाहो, तो पुरी कायनात तुम्हे उससे मिलाने मे लग जाती है!’ मी tttofficial ला बऱ्याच काळापासून फॉलो करत आहे आणि त्यांच्या प्रोजेक्टचा भाग होण्याची माझी खूप आधीपासून इच्छा होती. पण हे कसं होणार हे माहित नव्हतं. मी ग्रेटर कलेश मॅनिफेस्ट केलं होतं असं म्हणणं वावगं ठरणार नाही.” Akshaya Naik debut in Hindi Film |
View this post on Instagram
‘ग्रेटर कलेश’ हा चित्रपट प्रत्येक कुटुंबात घडणाऱ्या फॅमिली ड्रामाच उत्तम उदाहरण आहे. अक्षयाने या चित्रपटात ‘पंखुरी’ हे पात्र साकारलं आहे. हा चित्रपट जगभरात नेटफ्लिक्सवर नंबर १ वर ट्रेंड होताना दिसतो. या चित्रपटात अक्षयासह संगीता बालाचंद्रन, एहसास चन्ना, सुप्रिया शुक्ला, पूजन छाब्रा, केशव मेहता हे कलाकार देखील आहेत. Akshaya Naik debut in Hindi Film |
हेही वाचा :





