Kalki 2 : सिक्वलमध्ये भूमिका मोठी असणार; अभिनेत्री दिशा पटानीने सांगून टाकलं
Kalki 2 : दुसऱ्या भागात दिशा पटानी हिला जास्त स्क्रिन टाइम मिळणार असल्याचे तिने स्वतः सांगितले आहे.

Kalki 2 : चाहते साऊथ सुपरस्टार प्रभासच्या कल्की २८९८ एडी २ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाविषयी काहीना काही अपडेट समोर येत असतात. अशातच या चित्रपटात अभिनेत्री दिशा पटानी हिने साकारलेल्या पात्राला जास्त स्क्रिन टाइम देण्यात येणार असल्याची अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कल्की २८९८ एडी सिक्वलच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी शूटिंगच्या सेटवरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. कल्कीच्या पहिल्या भागाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली होती. पहिल्या भागात अभिनेत्री दीपिका पादुकोण महत्वाच्या भूमिकेत होती. दुसऱ्या भागात मात्र ती दिसणार नाही. त्यामुळे तिच्या भूमिकेसाठी अभिनेत्री साई पल्लवी हिला कास्ट केल्याची चर्चा आहे.
“कल्की २८९८ एडी” च्या दुसऱ्या भागात दिशा पटानीला जास्त स्क्रीन टाइम मिळणार आहे. सध्या तिच्या भूमिकेबाबत हा चर्चेचा विषय आहे. ती पहिल्या भागात फार कमी वेळ स्क्रिनवर दिसली होती. आता दिशाने खुलासा केला की दुसऱ्या भागात तिची भूमिका पहिल्या चित्रपटापेक्षा मोठी असेल. पहिल्या भागात माझे एक गाणे होते. पण सिक्वेलमध्ये पात्राला अधिक वाव मिळणार असल्याचे तिने सांगितले आहे. त्यामुळे तिचे चाहते तिच्या या भूमिकेसाठी उत्सुक आहेत.
प्रभास या चित्रपटांमुळे चर्चेत
प्रभासच्या “द राजा साब” चित्रपटची बरीच चर्चा झाली. पण बॅाक्स अॅाफिसवर चित्रपट अपयशी ठरला. हा चित्रपट त्याच्या बजेटची रक्कमही वसूल करू शकला नाही. या चित्रपटाशिवाय प्रभास फौजी आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या स्पिरीट चित्रपटात झळकणार आहे.
हेही वाचा : India Buy Russia Oil: तेल मिळणार, पण सूट नाही… ; भारत रशियाकडून जास्त किमतीत कच्चे तेल खरेदी करणार





