Deepali Sayed : रूपाली चाकणकरांचं पुन्हा एकदा ‘आ बैल मुझे मार’; अभिनेत्री दिपाली सय्यद यांची टीका
Deepali Sayed : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपले नाव, फोटो आणि वैयक्तिक शैलीची ट्रेडमार्क नोंदणी केली आहे.

Deepali Sayed : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपले नाव, फोटो आणि वैयक्तिक शैलीची ट्रेडमार्क नोंदणी केली आहे. यावरून ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ या चित्रपटातील अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. लोणावळा येथे बोलताना त्यांनी चाकणकर यांच्या ट्रेडमार्क नोंदणी प्रकरणावर टीका केली. (Deepali Sayed)
चाकणकर यांनी ट्रेडमार्क नोंदणी केली म्हणजे महाराष्ट्रात आता कोणी साडी नेसायची नाही का? तसेच, इथे लोणावळ्यातच रूपाली नावाच्या अनेक मुली आहेत, असे सय्यद म्हणाल्या. एक कलाकार म्हणून आपण ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ या चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट भोंदूगिरीविरोधात असून, त्यात एका राजकीय महिलेची भूमिका साकारली आहे, असे त्यांनी सांगितले. (Deepali Sayed)
चाकणकर स्वतःहून आपणच ती व्यक्ती असल्याचे सांगत आहेत, अशी टीकाही सय्यद यांनी केली. तसेच, चाकणकर यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सेन्सॉर बोर्डातही पुन्हा अडचणी निर्माण केल्या जात असल्याचे त्या म्हणाल्या. (Deepali Sayed)
मात्र, ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, त्याचे प्रदर्शन कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास दिपाली सय्यद यांनी व्यक्त केला. (Deepali Sayed)






