Deepali Sayyad | Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठी ( Big Boss) या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये झळकलेली मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद संपूर्ण सिझनभर विविध कारणांनी चर्चेत राहिली. तब्बल 100 दिवस घरात टिकून राहणाऱ्या मोजक्या स्पर्धकांपैकी एक म्हणून तिचा प्रवास प्रेक्षकांनी जवळून पाहिला. जरी तिला विजेतेपद पटकावता आलं नसले, तरी संपूर्ण सिझनमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा आनंद असल्याचं दिपाली सय्यद हिने स्पष्ट केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने ‘बिग बॉस’च्या घरातील अनुभव, मानसिक ताण आणि त्या प्रवासाने घडवलेला बदल याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. Deepali Sayyad घरातील अनुभव आणि मानसिक ताण… Deepali Sayyad दिपाली सय्यद सांगते की, “बिग बॉसच्या घरात राहणं म्हणजे केवळ टास्क नव्हे, तर सतत मानसिक सजगता ठेवणं आवश्यक असतं. प्रत्येक क्षणी विचार करून वागावं लागतं, आणि त्यातच खूप ऊर्जा खर्च होते.” तिच्या मते, घरातील मर्यादित सुविधा, खाण्यापिण्याच्या अडचणी आणि सततचा स्पर्धात्मक दबाव यामुळे अनेकदा ताण वाढतो. याच कारणामुळे तिचं वजन कमी झालं, असं ती सांगते. वजन घटण्याबाबत बोलताना ती म्हणाली, मी घरात सगळं खात होते, अगदी खीरही बनवली. पण सतत डोकं वापरावं लागत होतं, त्यामुळे मानसिक थकवा जास्त होता. त्यामुळे वजन कमी झालं.” तिने पुढे सांगितलं की, “माझं वजन आधी सुमारे 80 किलो होतं. गेल्या काही वर्षांत मी ते कमी केलं. पण लोकांसमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक मोठं व्यासपीठ हवं होतं, आणि ‘बिग बॉस’ ही त्यासाठी योग्य संधी ठरली.” पहिल्या सीझनपासून मला ‘बिग बॉस’ची ऑफर होती. पाचही सीझनला मी नाही म्हटलं… पण, सहाव्या सीझनवेळी मी स्वतःला आव्हान देण्याचं ठरवलं. म्हटलं करुन बघुयात… ही माझी परीक्षा आहे. माझ्या डोक्यात एवढंच होतं की, 100 दिवस मला राहायचंय आणि आता मला त्याचा आनंद आहे…” असं देखील अभिनेत्री यावेळी म्हणाली. दिपाली सय्यदची सिने कारकीर्द ! Deepali Sayyad दिपाली सय्यद या मराठी चित्रपटसृष्टीतील ओळखीचं नाव आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये तसेच सामाजिक विषयांवर आधारित भूमिकांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या अभिनयात ग्रामीण आणि वास्तववादी छटा दिसून येते. Deepali Sayyad : ‘खाण्यापिण्याच्या अडचणी, मानसिक थकवा…’; दिपाली सय्यदने सांगितला ‘बीबी’च्या घरातील100 दिवसांचा संघर्ष तसेच त्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही सक्रिय असल्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ‘बिग बॉस’मधील सहभागामुळे त्यांच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. ‘बिग बॉस’सारखा शो केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून तो व्यक्तिमत्वाची खरी कसोटी लावतो. या शोमधून अनेक स्पर्धकांना नवी ओळख आणि करिअरला वेग मिळतो. या सिझनमध्ये विविध क्षेत्रांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता आणि प्रत्येकाने आपापल्या शैलीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.