अभिनेत्री अदितीने दिली प्रेमाची कबुली, दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात?

Aditi Rao Hydari : मागील वर्षात अनेक सेलिब्रिटींनी लग्न बंधनात अडकत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. त्यानंतर 2024 या नव्या वर्षात देखील अनेक सेलब्रिटी विवाहबंधनात अडकणार आहेत. यातच आता एक नाव समोर आले आहे ते म्हणजे अभिनेत्री अदिती राव हैदरीचे (Aditi Rao Hydari). अदिती साऊथ अभिनेता सिद्धार्थ डेट करत असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्याचे पहायला मिळाले होते. याशिवाय दोघांना स्पॉटही करण्यात आले आहे. मात्र आता लवकरच दोघेही विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आदितीने सोशल मीडियावर सिद्धार्थसोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. याद्वारे तिने रिलेशनशिपचा स्पष्ट इशारा दिला आहे. त्यामुळे लवकरच हे दोघं आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करणार का?असा सवाल केला जात आहे. आदितीने नववर्षनिमित्त इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती सिद्धार्थसोबत दिसत आहे. आदितीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आनंदी, धन्य आणि कृतज्ञ. जादुई आनंदाबद्दल धन्यवाद. एकमेकांवर प्रेम करा. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,” असे लिहिले होते. अदिती आणि सिद्धार्थच्या या फोटोवर चाहत्यांकडूनही प्रेमाचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
अदिती आणि सिद्धार्थचं पहिलं लग्न यशस्वी होऊ शकले नाही. सिद्धार्थचे पहिले लग्न 2003 मध्ये झाले होते. मात्र 2007 मध्ये त्याने घटस्फोट घेतला. तर अदितीचं पहिलं लग्न सत्यदीप नावाच्या व्यक्तीशी गुपचुप लग्न झाले होते. मात्र 2013 मध्ये तिचा घटस्फोट झाला. 2021 मध्ये ‘महा समुद्रम’ या चित्रपटाच्या सेटवर अदिती आणि सिद्धार्थ एकमेकांच्या प्रेमात पडले. सिद्धार्थ हा अदितीपेक्षा सात वर्षांनी मोठा आहे. मात्र सध्या तरी दोघांच्या एकत्र फोटोनंतर सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.





