मुंबई – अभिनेते विजय पाटकर हे आपल्या विनोदी अभिनयासाठी ओळखले जातात. चेहऱ्यावरचे दिलखुष हावभाव आणि खुसखुशीत संवाद फेक यामुळे पाटकर अगदी सिरिअस प्रसंग देखील विनोदाने सर्वांपुढे आणून खळखळून हसवतातविजय पाटकर यांनी मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं. आगामी सर्कस या हिंदी चित्रपटात देखील ते दिसणार आहेत. यावेळी त्यांनी मराठीतील दिग्गज विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बाबतची एक आठवण सांगितली. विजय पाटकर यांनी काही वर्षांपूर्वी एका मालिकेचे दिग्दर्शन केलं होत ज्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रमुख भूमिका केली होती. परंतु काही कारणामुळे त्यांच्याकडे लक्ष्मीकांत यांना देण्यासाठी पैसे नव्हते. ते विचार करत बसलेले असताना लक्ष्मीकांत बेर्डे तेथे आलॆ त्यांना पाटकर यांच्या चिंतेचे कारण समजले. त्यावर ते म्हणाले मी तुझ्याकडं पैसे थोडी मागतोय, तू देशील तेवढी रक्कम घेईल,तू मला १ रुपया दिला तरी मी यात काम करेल असं लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यावेळी सांगितले. विजय पाटकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्या काळी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम देखील केले. रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस या चित्रपटामध्ये विजय पाटकर यांनी देखील विनोदी भूमिका साकारली आहे. सर्कस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना पाटणकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबाबतच्या आठवणी सांगितल्या.