अभिनेता स्वप्नील जोशीने खरेदी केली आलिशान टेस्ला कार? फोटो होतोय व्हायरल, एकदा बघाच…!

Swapnil Joshi : मराठी सिनेसृष्टीतील चॅाकलेट बॅाय या नावाने ओळखला जाणारा अभिनेता स्वप्नील जोशी नेहमीच सोशल मीडियावरील पोस्टममुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावरून स्वप्नील त्याच्या लाईफस्टाईलविषयी अनेक अपडेट्स शेअर करत असतो. त्याचे सोशल मीडियावर अनेक फॅालोवर्स आहेत. नुकतीच सोशल मीडियावर स्वप्नीनचा गाडीसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामुळे त्याने नवी कार खरेदी केल्याची चर्चा होत आहे. मात्र, आता या व्हायरल होणाऱ्या फोटोचे सत्य समोर आले आहे.
दरम्यान, स्वप्नीलच्या फोटोमध्ये दिसत असलेली कार स्वप्नीलची नाही, तर ही कार गुजरातमधल्या एका उद्योजकाची आहे, अशी माहिती समोर आली आहे. स्वप्नील जोशीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये स्वप्नीलसोबतच एक गाडी दिसतेय. ती गाडी Tesla Cybertruck आहे. स्वप्नीलनं टेस्लाकारसोबतचे फोटो पोस्ट करत “ही तुझ्यासाठी आहे राघव! टेस्ला सायबरट्रक” असं कॅप्शन दिले आहे. या पोस्टनंतर स्वप्नीलने कार खरेदी केल्याचे असे समजून चाहत्यांनी शुभेच्छांच्या कमेंट्सचा वर्षाव केला. “घेतली काय? भावा एक चक्कर देना”, अशी काही कमेंट्स त्याच्या चाहत्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
स्वप्नील जोशी कामानिमित्त गुजरातमध्ये गेला असावा आणि त्यावेळी त्याने हा फोटो काढला असावा असे सांगितले जात आहे. टेस्ला कार घेण्याचं अनेकांचे स्वप्न असते. पण ही कार आयात करावी लागते. भारतात काही लोकांकडेच ही कार आहे. त्यापैकी गुजरातमधील एका उद्योजकाकडे ही कार आहे.
हेही वाचा: Rinku Rajguru : ..अन् वडिलांनी घराबाहेर काढलं; रिंकूने सांगितली ‘ती’ आठवण, असं काय घडलं होतं?





