अभिनेता सुशांत शेलारला ओळखणे झाले कठीण; चाहते चिंतेत

Sushant Shelar | प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर आता ‘धर्मवीर 2’ चित्रपट रिलीज झाला आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा ग्रँड प्रीमिअर नुकताच मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला अनेक कलाकरांनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता सुशांत शेलारदे खील उपस्थित होता.
सध्या या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात सुशांत शेलारला ओळखणेही कठीण झाल्याचे दिसते. या व्हिडिओमध्ये सुशांत खूप बारीक झाल्याचे दिसत आहे. तो आजारी असल्यासारखा वाटत आहे. यामुळे चाहते त्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
सुशांत शेलारचा ‘दुनियादारी’ मधील डायलॉग आणि लुक चांगलाच चर्चेत होता. परंतु अचानक त्याच्यात झालेला हा बदल पाहून चाहते देखील अचंबित झाले आहे. अनेक चाहते कमेंट करत ‘काय झाले ह्यांना काळजी घ्या,’ इतके बारीक कसे झालात,’ अशी विचारणा करत आहेत.
View this post on Instagram
सध्या सुशांतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, सुशांतने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय तो मराठी बिग बॉसमध्येही सहभागी झाला होता.





