Airbus A320 | भारतात इंडिगो आणि एअर इंडिया ग्रुपच्या ३५० हून अधिक ए३२० विमानांची उड्डाणे या अपग्रेडसाठी थांबवली जाणार आहे. या कंपन्यांकडे असलेल्या ए३२० श्रेणीतील विमानांमध्ये काही तांत्रिक बिघाड सापडला आहे. यामुळे शेकडो विमान उड्डाणांवर परिणाम होऊन हजारो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकेल, अशी माहिती समोर आली आहे. अमेरिकन विमान कंपनी जेटब्लूचे कॅनकुन ते न्यूआर्क हे ए३२० विमान ३० ऑक्टोबर २०२५ रोजी पायलटच्या सूचनांशिवाय अनपेक्षितपणे खाली उतरले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एअरबस विमानांचे सॉफ्टवेअर अपग्रेड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फ्रान्सस्थित एअरबस या विमान कंपनीने सूर्याची तीव्र किरणे काही विमानांमधील फ्लाईट कंट्रोल सिस्टिमसाठी आवश्यक असलेला डेटा खराब करू शकतात. तसेच हा डेटा जर चुकीचा निघाला तर विमानाच्या कंट्रोलवर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी माहिती दिली आहे. ६,००० विमानांच्या उड्डाणांवर परिणाम या कारणामुळे इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्यांनी सॉफ्टवेअर अपग्रेडसाठी विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन ते तीन दिवस लागणार आहेत. सोमवार किंवा मंगळवारपर्यंत या विमानांची उड्डाणे पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. यामुळे जगभरातील सुमारे ६,००० विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होणार आहे. सध्या भारतामध्ये ५६० हून अधिक ए३२० विमाने प्रवासी वाहतुकीसाठी वापरात आहेत. तसेच त्यामधील सुमारे २०० ते २५० विमानांमध्ये त्वरित तपास आणि बदलाची आवश्यकता निर्माण झाली आहे. यातील काही विमानांमधील सॉफ्टवेअर बदलावा लागणार आहे. तर काहीमधील हार्डवेअर थेटपणे रिप्लेस केला जाणार आहे. Airbus A320 | याबाबत इंडिगोने सांगितले की, त्यांच्या ताफ्यातील बहुतेक विमानांचे उत्पादक असलेल्या एअरबसने ए३२० फॅमिली विमानांबाबत जारी केलेल्या सूचनेची त्यांनी दखल घेतली आहे.यादरम्यान, विमानांना काही काळ थांबवाले लागणार आहे. त्यामुळे उड्डाणे उशिरा होण्याची किंवा ती रद्द होण्याचीही शक्यता आहे. Airbus A320 | एअर इंडियाची पोस्ट एअर इंडिया एक्सप्रेसनं सांगितलं की, त्यांच्या जास्तीजास्त विमानांमध्ये या समस्येचा प्रभाव पडलेला नाही. मात्र जागतिक निर्देशांमुळं काही उड्डाणे उशीरा तर काही रद्द होऊ शकतात. कंपनीनं आपल्या प्रवाशांना संपर्क क्रमांका अपडेट ठेवण्याचे आणि आपल्या उड्डाणाबाबतची ताजी माहिती वेबसाईट किंवा चॅटबॉट, मोबाईल अॅपवर चेक करत रहा असा सल्ला दिला आहे. हेही वाचा: Tere Ishk Mein: धनुषची धमाकेदार एन्ट्री; आमिर-अक्षयला टाकलं मागे!