अभिनेता हृतिक रोशनची नवी सुरुवात; दिग्दर्शन क्षेत्रात करणार पदार्पण

Hrithik Roshan | अभिनेता हृतिक रोशनने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासह त्याच्या डान्समुळेही त्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे. मात्र आता हृतिक एक नवी सुरुवात करणार आहे. हृतिक आता लवकरच दिग्दर्शक म्हणून भेटीला येणार आहे.
हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी स्वत: याविषयी सांगितलं आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्ट्सनुसार, हृतिक रोशन ‘क्रिश 4’ मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून यावेळी तो दुहेरी भूमिका अर्थात दिग्दर्शकाची देखील भूमिका साकारणार आहे. राकेश रोशन यांनी सांगितलं की, “मी ‘क्रिश 4’ चं दिग्दर्शन माझ्या मुलाला हृतिक रोशनला देत आहे. त्याने या फ्रँचायझीच्या सुरवातीपासूनच माझ्यासोबत या कथेचा अनुभव घेतला आहे.”
राकेश रोशन पुढे म्हणाले, “मला यावर गर्व आहे की, तो एक असा चित्रपट घेऊन येत आहे, जो आमच्यासाठी एक कुटुंबाच्या रूपात खूप महत्त्वाचा आहे. ‘क्रिश’ने जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. हृतिक आता या सुपरहीरो कथेच्या पुढील भागात काम करणार आहे आणि जो काही माझा दृष्टीकोन आहे त्याला तो एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल.”
आदित्य चोप्रा ‘क्रिश ४’ चे निर्माते आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले, “आदित्य आणि यशराज फिल्म्स हे ‘क्रिश ४’ च्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. आदित्यनंच हृतिकला दिग्दर्शक बनवण्याचा निर्णय घेतला. आदित्य आणि हृतिकची निर्माता-दिग्दर्शक जोडी एक अफलातून आणि अप्रतिम असेल. आदित्य आणि यशराज फिल्म्स हे ‘क्रिश 4’ च्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.” Hrithik Roshan |
दरम्यान, ‘क्रिश’ चित्रपट भारतातील लोकप्रिय सुपरहीरो फ्रँचायझी आहे. याची सुरुवात ही २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटानं झाली होती. त्यानंतर २००६ मध्ये ‘क्रिश’ आणि २०१३ मध्ये आलेल्या ‘क्रिश ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. त्यानंतर आता ‘क्रिश ४’ची सर्वांना उत्सुकता लागली आहे. Hrithik Roshan |
हेही वाचा:





