स्वारगेट प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; दत्तात्रय गाडेला पकडून देणाऱ्याला 1 लाखांंचं बक्षीस जाहीर

Dattatray Gade | स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३६, रा. शिक्रापूर) हा जामिनीवर सुटलेला असून त्याच्या शोधसाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहेत. पीडित तरुणीला धमकावून तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर पसार झाला. अद्यापही गाडे फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. तर गाडेला पकडून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वी चोरीसह 7 गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी आठ पथके तयार केली असून, त्याच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू आहे.
पोलिसांचे आवाहन
पुणे पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यासाठी नागरिकांची मदत मागितली आहे. आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मेडिकल रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर
दरम्यान, पीडित तरुणीचा मेडिकल रिपोर्ट आला असून, या मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरुणीच्या मेडिकल रिपोर्टमध्ये नराधम दत्तात्रय गाडे याने एकदा नव्हे तर दोनवेळा बलात्कार केल्याची स्पष्ट झाले आहे. बुधवारी संध्याकाळी ससून रुग्णालयाने हा मेडिकल रिपोर्ट पोलिसांना दिला.
नेमकं काय घडलं?
पुण्यात नोकरी करणारी तरुणी पहाटे 5:30च्या सुमारास फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली. बसची वाट पाहत असताना गाडेने ताई फलटणची बस येथे लागत नाही, पलीकडे लागते, असे सांगितले. मात्र, पीडितेने मी नेहमीच येथून बसते, असे म्हणत पलीकडे जाण्यास नकार दिला. त्यावर त्याने विश्वास संपादन करत तिला स्वारगेट-सोलापूर शिवशाही बसजवळ नेले.
तिने बसमध्ये अंधार असल्याचे सांगितले. यावर गाडेने प्रवासी लाइट बंद करून झोपले असल्याचे सांगितले. मोबाईलची लाइट लावून बघून ये, असे तो म्हणाला. त्यानंतर तरुणी विश्वास ठेवून बसमध्ये चढली मात्र गाडेने तिचा गळा आवळला आणि तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.
२४ सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कारवाई
स्वारगेट बस स्थानाकातील या घटनेनंतर २४ सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकाने घेतली असून एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
हेही वाचा:





