Baba siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपी जामिनावर मुक्त; मुंबई हायकोर्टाचा निर्णय चर्चेत !
काँग्रेस नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी आकाशदीप करज सिंग याला सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Baba siddique – काँग्रेस नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी आकाशदीप करज सिंग याला सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
या प्रकरणात जामीन मिळवणारा तो पहिला आरोपी ठरला आहे. न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला असून, खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत सिंगने मुंबई सोडू नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
वांद्रे पूर्व येथे १२ ऑक्टोबर २०२४ रोजी बाबा सिद्दिकी (६६) यांची त्यांच्या मुलगा झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. नोव्हेंबर २०२४ मध्ये अटक झालेला २२ वर्षीय सिंग हा पंजाबचा रहिवासी आहे.
जामीन अर्जात सिंगने आपल्याला खोट्या पद्धतीने गोवण्यात आल्याचा दावा केला होता. त्याच्यावर केवळ संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य असल्याचा आरोप असून, या हत्येत त्याची कोणतीही ठोस भूमिका दाखवण्यात आलेली नाही, असा युक्तिवाद त्याने केला.
तसेच खटला लवकर सुरू होण्याची शक्यता नसल्याने खटल्याविना कारावास हा मूलभूत अधिकारांचा भंग असल्याचेही त्याने नमूद केले. या प्रकरणात पोलिसांनी २६ जणांना अटक केली असून, सर्वांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही बातमी वाचा :
Baba Siddiqui case: मुख्य आरोपी झीशान अख्तर कॅनडात ताब्यात, मुंबईत आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न






