Asha Bhosle : शेवटच्या श्वासापर्यंत सुरांची साथ! ‘या’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू; शेवटचं गाणं कोणतं गायलं?
Asha Bhosle : आशा भोसले यांना आशाताई म्हटले जायचे. त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. शेवटचं गाणं त्यांनी वयाच्या 91 वर्षी गायलं होतं.

Asha Bhosle : भारतीय संगीतविश्वातील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं आहे. शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
‘सुरांची मलिका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल 12 हजारांहून अधिक गाणी विविध भाषांमध्ये गाणी गाऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तब्बल आठ दशकं त्यांनी संगीत क्षेत्राला वाहून घेतलं आणि सातत्याने सक्रिय राहून नवा इतिहास घडवला.
त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे त्या सतत चर्चेत राहिल्या. अवघ्या 10 व्या वर्षी त्यांनी गायनाची सुरुवात केली. 1953 साली ‘माझा बाळ’ या मराठी चित्रपटातील ‘चला चला नव बाळ’ हे त्यांचं पहिलं गाणं होतं. त्यानंतर 1948 मध्ये ‘चुनरिया’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं. 1949 मधील ‘रात की रानी’मधील एकल गाण्याने त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. 1953 मध्ये आलेल्या ‘परिणीता’ या चित्रपटात गायलेल्या गाण्यामुळे त्यांच्या कारकीर्दीला कलाटणी मिळाली.
आशा भोसले यांना दोन राष्ट्रीय पुरस्कारांसह सात फिल्मफेअर पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या नावाची नोंद गिनेस वर्ल्ड रेकॅार्डमध्येही झाली आहे.
वयाच्या 91 वर्षी गायलं शेवटचं गाण
विशेष म्हणजे, आशा भोसले या 92 व्या वर्षापर्यंत सक्रिय राहिल्या. त्यांनी 91 व्या वर्षी ‘सैया बिना’ हे शेवटचं गाणं रेकॉर्ड केलं, ज्यात त्यांची नात जनाई भोसले हिनेही सहभाग घेतला होता. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वाने एक अमूल्य आवाज कायमचा गमावला आहे. त्यांच्या जण्याने एका गायन युगाचा अस्त झाला आहे. पण त्यांच्या गाण्यांमुळे त्या चाहत्यांच्या सदैव लक्षात राहतील.






